Monday, December 5, 2016

पप्पा सांगा कुणाचे?… पप्पा, आम्हा चौघांचे ...!!


                                          

अलीकडे आलिया भट आणि शाहरुख खान चा “Dear Zindagi”  सिनेमा बघितलात्यात शाहरुख खान हिरोईनला विचारतो, "तुम्हारी बचपन कि कोई एक याद?" आणि घरी आल्यावर मी सहज  विचारात पडले ..अरे आपल्या सगळ्यांच्या तर..असंख्य आठवणी असतात....आणि हिला एक आठवण सांगायला एवढा विचार का बरं करावा लागावा? (....त्याचा उलगडा झाला देखील नंतर).  काहीही आवश्यकता नसताना, मी उगाचच आगाऊपणा करून सिनेमातल्या आलियाच्या बचपनच्या आठवणींचा  analysis करीत असतांना, हळुहळु मी माझ्या स्वतःच्या बचपन च्या  आठवणीं मध्ये कधी हरवून गेले, माझं मलाच कळलं नाही..

आमची आई - श्रीमती.स्नेहल सुरेश गोवेकर, कोलगेट पालमोलिव्ह मधल्या 30+ वर्ष्यांच्या सर्व्हिस नंतर सेवानिवृत्त. नर्सिंग कोर्स व वैद्यकीय क्षेत्राची तिला विशेष आवड, त्यामुळे प्रत्येकाच्या अडीअडचणीला, मदतीला कायम धावून जाणारी.


अतिशय कष्टाळू. मराठी आणि संस्कृत भाषेवर विशेष प्रभुत्व. शिवणकाम, भरतकामविणकाम या सगळ्यात पारंगत. व्यवहारदक्ष. तर आमचे पप्पा - कै. श्री. सुरेश वसंत गोवेकर म्हणजे पप्पा गोवेकर AIR INDIA –Ground Services 30+ वर्षा नंतर इमाने इतबारे नोकरी करून सेवानिवृत्त.  Automobile क्षेत्रात विशेष रुची असल्याने गाड्या - विमानांवर त्यांचे 

अतोनात प्रेम.   प्रसंगी अति-तापट, रागीट  पण शिस्तप्रिय, खेळकर, विनोदी स्वभाव. गणपतीचे पाच दिवस सोडले तर आयुष्यात कधीच उपास, तापास , व्रत-वैकल्यांना जुमानणारे!   “गणपती बाप्पा”- त्यांचं आराध्य दैवत आणि जे.आर.डी.टाटाहे त्यांचं एकमेव श्रद्धास्थान.  खऱ्या अर्थाने “Work is Worship” - जगणारे असे आमचे आई-पप्पा!. मला आजही चांगलं आठवतं, आमच्या घरी देवाधिकांच्या फोटोला हार, माळा घालायच्या आधी, टाटांच्या फोटोला नियमितपणे फुल वाहिली जायचीअत्यंत श्रद्धेने, आदराने ह्या युग-पुरुषाचे मनोभावे चिंतन केले जात असे.   प्रत्येक वेळीं विमान -प्रवासात,  Flight सुरु होण्या आधी , पप्पा डोळे मिटून त्यांचे मनःपूर्वक आभार मानीतआज टाटांच्यामुळेच मला आजचा  हा दिवस बघायला मिळतो आहे ..ह्या जाणीवेनेच कृत-कृत्य होऊन त्यांच्या पुढल्या प्रवासाची सुरुवात होत असे .


आम्ही मुंबईत "दादर" ह्या मध्यवर्ती भागात, स्टेशन च्या अगदी जवळ रहात असल्याने , आमचं घर हे नातेवाईक, मित्रपरिवार, देशी विदेशी पाहुण्यांसाठी अगदी हक्काचं आश्रयस्थान - विसावा गृह होतंत्यामुळे घरात पाहुण्याची वर्दळ - ये जा अगदी कायमची ठरलेली. आणि  ही दोघं सगळ्यांच्या पाहुणचाराला सदैव तत्पर.                                        
संध्याकाळी, दिवे लागल्यानंतर कोणीही पाहुणा, आमच्या घरून जेवता जात नसे , म्हणजे  तसा दंडक होता आमच्या आईचा.  आई-पप्पा मोठ्या कंपनीत, चांगल्या हुद्द्यावर 
असल्याने, आई पप्पांचं स्वकष्टार्जितआमचं हे सर्वसुखसंपन्न घर. पप्पांच्या प्रत्येक सुख-दुःखात, यश-अपयशात नेहमी साथ देणारी "सहधर्मचारिणी" - अशी आमची आईखूप श्रीमंत जरी नसलो तरी, मोठ्या मनाने, आल्या गेल्या प्रत्येकाचं  सहर्ष स्वागत झाल्याने दादरच सुखवस्तू घर लहान, आटोपशीर असून देखील कधी कोणालाच, कशाचीच कमतरता भासली नाही. किंबहुना आई-पप्पांनी ती भासवू दिली नाही ….असो.


पप्पांना योगासन त्याच प्रमाणे बॅडमिंटन, क्रिकेट, बॉक्सिंग या खेळांची विशेष आवड.  उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि व्हायोलिनिस्टअभंग, भजन, नाट्यसंगीतशास्त्रीय-संगीत या सगळ्यात तासंतास रमुन जाऊन, ते अगदी तल्लीन होत असत
श्री.सुधीर फडके, श्रीनिवास खळे, पंडित भीमसेन जोशी
डॉ.वीणा सहस्रबुद्धे यांच्या बंदिशी,स्वररचनागीतरामायण आपल्या सुश्राव्य हार्मोनियम वादनाने, ते ऐकणाऱ्याला मंत्र-मुग्ध करीत असत. 

आठवड्यातून एकदा, सुट्टीच्या दिवशी पप्पा आम्हाला सगळ्यांना प्लाझा सिनेमाच्या समोरच्या "तृप्ती" रेस्टॉरंट मध्ये बटाटा-वडा आणि फालुदा खायला न्यायचे. हा आमचा कार्यक्रम अगदी वर्षानुवर्षे नियमितपणे ठरलेला. ....पाककला ही त्यांची खास स्पेशालिटी  होती.   सुट्टीच्यादिवशी सकाळी सिटी-लाईट ला जाऊन अगदी भरपूर वेग- वेगळ्या प्रकारचे मासे आणूनस्वतः ते मालवणी - गोवन पद्धतीचे माश्याचे प्रकार आम्हाला  तसेच त्यांच्या पारसी , ख्रिश्चन, अँग्लो-इंडियन मित्रांना अगदी मनापासून आवडीने खाऊ घालत असत.  त्यांच्या हातच्या कुर्ल्या, शिंपल्या, मोरी, रावस, हलव्याच्या कालवणाची / तिकल्याची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे....


दर रविवारी आमचे पप्पा आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हा चार भावंडाना (ताई (उज्वला), ज्योती, विजय, सरोज ) पोहायलाबॅडमिंटन खेळायला, सायकल चालवायला न्यायाचे. मी शेंडेफळ असल्यानें माझी - सायकल वजा स्कुटर - तीन-चाकी पण एक पाय जमिनीवर मारत ढकलायची ...तुम्हाला कळली ना ...?  हुश्य...!

आमच्या हिंदु कॉलनीच्या " राजगृह " घरातून दर रविवारी सकाळी रुईया कॉलेजच्या मैदानांत आमची "गोवेकर पलटण" - म्हणजे पपा आणि आम्ही सगळेजण मोठ्या थाटात सायकलिंग ला निघत असूताई, ज्योती आणि माझा भाऊ विजय (माझी मोठी भावंडं ) भाड्याने सायकल घेतंत्या वेळी तासाला एक रुपया असा दर होतातेव्हा रुईयाच्या मैदानात , सिमेंटच्या बेंच/खुर्च्या असायच्या..(आता आहेत की  नाहीत , मला ठाऊक नाही.)  नेहमीप्रमाणे आम्ही सायकली भाड्याने घेतल्या आणि  मैदानात चालवायला लागलो.  तेव्हा त्या सिमेंट च्या खुर्चीत एक आजोबा, हाताने विळखा घालून, पाय पोटाशी धरूनमस्तपैकी हवेत तंगड्या हालवीत, छानपैकी शुद्ध, ताजी हवा खात बसले होतेमाझी ताई, राज कपूरच्या अनाडीतल्या नूतन सारखी - "बन के पंछी गाये प्यार का तराणा" स्टाईल मोठ्या सायकल वर बसून छान वेगाने पुढे जाऊ लागलीसगळेच भिडू नवशिके आणि त्यांच्यामागे बिचारे आमचे पप्पा…..! ताई च्या सायकल चा स्पीड कधी वाढला हे कळायच्या आधीच, मॅडम, जाऊन त्या खुर्चीवर धाडकन आदळल्या ..आम्ही सगळे मागून ओरडतोय ..ताई ब्रेक मार, ब्रेक मार ..पण त्या भाड्याच्या सायकलचा ब्रेक जिवंत असेल तर मारणार ना ....? आणि पाय खाली टेकायची पण बोंब, त्यामुळे सायकल थांबवायचे पण वांदे ...ती सायकल पार त्या आजोबांच्या ढेंगामध्ये, पण त्या सिमेंटच्या खुर्चीवर जाऊन आदळली आणि सायकल चा टायर देखील फट्कन फुटलाआम्हाला वाटले कीआजोबा आता "अल्ला को प्यारे" झाले असावेत बहुतेक. पण ते अतिशय घाबरून उठून, ताठ च्या ताठ, त्याच खुर्चीवर थरथरत उभे राहिले होते ... झाल्या प्रकारे मुळे ते आजोबा, माझी ताई, आमची समस्त गोवेकरपलटण - सगळ्यांना हसावे कि रडावे ..नक्की कळेना. आमच्या नशिबानें आणि त्यांच्या सुदैवानें, त्या आजोबांना काही अपघात/इजा वगैरे झाली नाही. आयत्यावेळी ब्रेक ने दगा दिलेल्या, त्या खटारा सायकलचा टायर फुटल्याने, १५ रुपये दंड भरावा लागला तो वेगळा. माझी खात्री आहे, संडे स्पेशल मूड मधल्यानिवांत हवा खात बसलेल्या आजोबांनी, त्यांच्या उर्वरित आयुष्यातनवशिक्या सायकल स्वारांचा नक्कीच मनस्वी धसका घेतला असणार...असो.


जेव्हा जेव्हा हा प्रसंग मला आठवतोतेव्हा तेव्हा आम्हा चौघांच्या सायकलीं मागून धावणारे , घामाघूम झालेले , जीवनाच्या शर्यतीत आम्हा सगळ्यांना वेळोवेळी सांभाळणारे , पडता पडता  तोल सावरायला शिकवणारे आमच्या चौघांचे " आई -पप्पा गोवेकर "  माझ्या अगदी डोळ्या समोर उभे राहतातआणि आजही तेच सांगतात …."Show must go on….  "!!

तर मंडळी, जन्मदात्या आई-वडिलांचे किती आणि कसे उपकार मानायचे ? का त्यांच्याबरोबरच्या असंख्य , अनमोल  आणि अविस्मरणीय आठवणींच्या साठ्यात स्वतःला हरवून जायचं ?का त्यांच्या  गैरहजेरीत त्यांच्या आठवणींनी व्याकुळ, त्रस्त होऊन रडत बसायचंएक ना दोन ..…तर अश्या हजारो अनुत्तरीत प्रश्नांचा मनात कोलाहल माजला असतांना , आई-पप्पांच्या बरोबर घालवलेल्या काही सुखद क्षणांचा हा छोटासा " Replay ".  Rest in next…!


                                                       सौ.सरोज प्रशांत जावकर(गोवेकर) 
                                                                    6th December 2016



(माझी खात्री आहे की तुम्ही माझ्या शुद्धलेखनाच्या असंख्य चूका पोटात घ्याल. धन्यवाद!)  

6 comments:

  1. Salute to you saroj for remembering your parents and writing such wonderful memories about them. You reminded me about my parents. It is very rare these days that children or we adults remember or miss our parents. Life has become very fast. In our busy schedule we have time only for earning and running aftr money. For every thing else we say " mala vel nahi".
    Iam touched by your blog. Its indeed an eye opener to all youngsters today who calculate eveything in terms of money and selfishness.
    Mother and Father both are responsible for the growth of an individual
    Hats off to you for writing this blog.Thank you

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Meena Tai...Your kind words and appreciation means a lot to me! My very first blog brought tears in many eyes, including me when i read it to my mom on the phone,few days back. When I actually started writing this article, I was not quite sure about the end product..but i still went on. There are tons of memories that can be added here, I finally realized that its hard for me to stop ... and had to force myself to save it for the next one. I feel very much blessed to have parents like my Aai & Papa...Once again, thank you so much for your support and encouragement...let's keep in touch!!

      Delete
  2. खूप छान !
    Nitin

    ReplyDelete
  3. Excellent my dear. I know the bicycle incident and have heard it from you a hundred times, but it is still entertaining every time I read it. The finishing para is especially touching and always brings a tear to my eyes. Keep writing....
    Love - Prashant

    ReplyDelete
  4. Very nice Saroj. Treasure the memories. Had the pleasure to listen you read it out yourself. Keep up with the writing.

    Suresh

    ReplyDelete
  5. Dear Saroj, very well written. You missed to mention bhavgeet singer 'Gajanan Watwe'. Your father was fond of his music and songs. There was funny incident happened with me at your home on this topic 😂 my hubby is reluctant going to my friends place. But when I described him about your father's love towards JRD, he was curious to meet him. Very well written Saroj. Keep it up. Waiting for next blog

    ReplyDelete