Monday, December 26, 2016

IPOD


IPOD - Indian Parents On Duty....



संध्याकाळी ऑफिसहून ट्रॅफिक मधून वाट काढत, मजल-दरमजल घरी परतले. दिवसभराच्या दगदगीने जीव पार दमला होता..घरात शिरल्यावर लगेचच,  नेहमीप्रमाणे कामांची ही भली मोठी यादी माझ्या सहर्ष स्वागताला हजर होतीच. पर्स, बुट, जॅकेट काढे काढे पर्यंत मिहिररावांची (वय वर्षे14) जाहीर 
घोषणाI  am HUN-sss-G-sss-RY-sss!  
घरातल्या सगळ्यांच्या म्हणजे इन-मिन चौघांच्या पोटातल्या सगळ्याच कावळ्यांनी, एकाच वेळी Jazz , Hip-hop , Bolly -Fit , Zumba करायचे ठरविल्याने तातडीने स्वयंपाक करणं फारच निकडीचे होतं. झटपट स्वैपाक केला आणि पटापटा सगळ्यांची जेवणं उरकली देखील. मंडळी परत आपापल्या कामात व्यस्त. जेजे(आमचा भूभू -पिल्लु) सकट सगळ्यांची पोटे, शांत झाली आणि "रुद्रावतार" धारण केलेला जठराग्नी मंदावला. मोठ्या आतुरतेने माझी वाट पाहत असलेल्या, सात माजली दहीहंडी खेळत असलेल्या भांड्यांचा ढीग एकदाचा आवरला. जरा हुश्य.. म्हणून सोफ्यावर टेकते ना टेकते, तोच रिचा बाई (वय वर्षे १६) परत खाली अवतरल्या. मोठा गंभीर चेहरा करून, नाकावरची माशी सुद्धा न हलवू देतं, Mom, Dad ... We need to talk, I have very important things to discuss with you both.  मला फुल्ल टेन्शन ...मनात म्हंटल आता ही बया...काय सांगते आणि काय विचारते ?-- (सोळावं वरीसधोक्याचं ग धोक्याचं ...मागून background मध्ये कानाशी गाणं वाजू लागलं... वाजवी पेक्षा जास्त हिंदी, मराठी सिनेमे बघितल्याचा हा परिणाम..  तंबू में फुल्ल घबराहाट ..! ) पण तसं काहीही न होता, तीने तिची प्रश्नावली सुरु केली – As a part of my Psychology project , I need to know if you guys think if I have any personality changes when I was a child and now as an young adult?   
एका फटक्यात माझं आणि प्रशांतचं उत्तर: No. You were always very quiet, happy, fun loving child. मग यावर तिचा पुढचा प्रश्न:  And what made me that?  Any specific reasons as such?  एका क्षणाचाही विलंब न करता, आम्ही दोघांनी त्याचं पूर्ण श्रेय, गोवेकरआजी आणि जावकर आजी-आजोबांना देऊन टाकलं. आई-वडील म्हणून आपण सगळेच, आपली कामगिरी, कर्तव्यआपल्या परीने चोख बजावत असतोच पण माझा असा ठाम विश्वास आहे कि बाल-संगोपनात "आजी-आजोबा" हा एक अतिशय महत्वाचा असा, अविभाज्य घटक आहे. रिचाच्या ह्या प्रश्नाने मन अगदी सहज 16 वर्ष झट्कन मागे वळलं ...आणि जुन्या आठवणींचा आढावा घेऊ लागलं.

रिचाच्या जन्माच्या वेळी माझी आई (लता आजी)आणि माझी मोठी बहीण, ज्योती माझ्या मदतीला, सगळे बाळंत-काढे, डिंक-लाडू सगळ्या देशी आवश्यक औषधांचा बटवा घेऊन जय्यत तयारीनिशी आल्या होत्या. त्यानंतर माझे सासू-सासरे म्हणजे (स्मिताआजी आणि पप्पा आजोबा) हे सहा-सहा महिने इकडे राहत असत. त्यामुळे त्यांचा कायमचाच आधार असायचा.

मला आठवतं की मिहीरच्या जन्मावेळी, डिलेव्हरी 16-18 तास लांबल्याने, आई पुरती घाबरली होती. यापूर्वी देखील आई जवळ जवळ 20 वर्षांपूर्वी अमेरिकेत येऊन गेली असल्याने, अमेरिका तिला खूप नवीन नव्हती, पण या वीस वर्षांनंतरच्या अमेरिकेची तोंड ओळख होण्या आधी, ती आल्यावर लगेचचदुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटल मध्ये जावं लागलं. ती छोट्या रिचाला घेऊन, श्रीमती.विसाई काकीं बरोबर घरी थांबली होती, बराच वेळ झाला पण आमची काहीच बातमी/खुशाली कळेना.  काही unexpected  minor complications  मुळे थोडा जास्त वेळ झाला पण संभाव्य धोका टळला होता. त्यावेळी प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली...संकटाच्या वेळी आपल्यासाठी देव पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं तर आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं ....घरात कोणीतरी मोठं पाहिजेच....!

दररोज सकाळी सहा वाजता, आजोबा (पप्पा जावकर) नियमितपणे योगाभ्यास करीत. आजोबांच्या "ओम" ने, जवळजवळ सातच्या आसपास आमच्या पिल्लावळीला चाहूल लागताच, ही फौज गडबडीने खाली उतरून, धावत सर्वात आधी आजी-आजोबांच्या समाचाराला सज्ज. मिहीरला तेंव्हा जिना उतरता येत नसल्याने, तो आपला घसरगुंडी सारखा हळुहळू खाली घसरत येत असे. मगआले रे आलेअसं म्हणत आजोबा आपला योगाभ्यास आटोपता घेत असत. दिवसाची सुरुवात शवासनातल्या आजोबांशी डॉक्टर-डॉक्टर ह्या खेळाने होत असे. रिचा(वय वर्षे - सव्वा चार) आणि मिहीर (वय वर्षे - दोन). आजोबांच्या डोक्याचा-चेहऱ्याचा full  कब्जा डॉ.रिचा घेत असत. तर डायपरवाले डॉ.मिहीर, आजोबांच्या गरगरीत पोटावर, त्यांचं T-शर्ट खेचून, मोठ्या शिताफीने चढून स्वतःच्या बापाची विरासत असल्यासारखे (एका अर्थी ते ही खरंच म्हणा... स्वतःच्या बापाच्या, बापाची ढेरी म्हणजे त्याची मालकीची, हक्काची इस्टेटनाही का?) .  डॉ.मिहीर स्थानापन्न झाल्यावर, आजोबांच्या छातीवर लोळण घेतत्यांच्या गळ्यातली सोन्याची चेन आणि त्यातलं रुद्राक्षआपल्या बाल-मुठीत घेऊन, दररोज मोठ्या उत्साहाने, विलक्षण कुतूहलाने, छोटेसे डोळे किलकिले करत निरागस पणे न्याहाळीत. त्या बालसुलभ मुद्रेवर...आजोबा फुलटू फिदा! ही प्राथमिक चाचणी झाल्यावर मोठ्या डॉक्टरीण बाईंना ग्रीन सिग्नल मिळत असे. मग आजोबांच्या तपासणी 2नाक-कान-मिशी” परीक्षा. आपल्या दोन्ही हाताच्या इवल्याशा बोटांनीआधी आजोबांचे कान ओढूनत्यात कुर्रर करून टेस्टिंग. मग दोन्ही कान हळुवारपणे आळीपाळीने पिळणे - मग आजोबा लगेच जीभ बाहेर काढत. आणि परत कान पिळले कि जीभ पुन्हा आत ...हा प्रकार भरपूर वेळ चालायचा. तिघंही अगदी खदखसुन हसायची. नेहमी हसतमुखप्रसन्न असणाऱ्या आमच्या आजोबांना कधी वेगळ्या Laughter Club ची गरजच भासली नाही. मग आजोबांच्या कानात बोटं घालुन गुदगुल्या करायच्याबिचारे आजोबा पण भलतेच सोशिक!  शेवटी एकदाका गुदगुल्या असह्य होऊन आजोबांनी मुंडी हालवली की मग मिशीचा नंबर. मिशी ओढून बघुनजागच्याजागी आहेयाची खात्री करुन घेतली जात असे. मग सगळ्यांत महत्वाची स्टेप म्हणजेआजोबांची रोजची विनामुल्य डोळे तपासणी. शवासनातल्या आजोबांची एका हाताने डोळा उघडून केलेली नेत्र चिकित्सा - अगदी सहजठरलेला रोजचा innocent प्रश्न - आजोबातू  झोपला काआजोबा नक्की....जागे आहेत कि झोपले आहेत?  हे त्यांचा, एक डोळा उघडून ठरवलं जात असे. ह्या ENT Specialization  मध्ये ह्या तिघांची स्वतःची अशी वेगळीच mastery होती.

मग आजोबा सगळ्यांना एका रांगेत उभं करून हाता-पायाचे-मानेचे व्यायाम करायला लावायचे. ही बिलंदर पिल्लावळ कधीआजोबांना चाट देऊन तर कधी cute शी smile देऊन एक तर तिकडून पळ काढायची किंवा आजोबांच्या पायाला घट्ट विळखा घालून लटकत बसायची. म्हणजे आजोबांच्या व्यायामाचा पूर्ण बट्याबोळ. असो. 

सकाळच्या व्यायामा नंतर आजीच्या हातचा गरमागरम ब्रेकफास्ट. मस्त साजुक तुपातला, काजू-पिस्ते-बेदाणे वाला full loaded  शिरा, उप्पीट, थालीपीठ, साबुदाणा खिचडी, डोसा त्यामुळे मुल्लांना ह्या सगळ्या न्याहारीच्या पदार्थांची आवड निर्माण झाली. मग जेवताना मस्त मऊ वरण-भात-तूप, पोळी, भाजी. वगैरे वगैरे...आजोबा रोज संध्याकाळी सॅलड खात असत, त्यामुळे मुलांना येता, जाता ल्येटूस, काकडी, टोमॅटोची पण सवय झाली. थोडक्यात म्हणजे मुलांना लहानपणीच चांगल्या पौष्टिक आहाराची गोडी लागणं, खूप महत्वाचं आहे. आणि माझ्या मते, घरी आजी-आजोबा असतील, तर अशी सगळीच Important  projects खूप patiently आणि regularly केली जातात. 

इकडे मला एक गोष्ट नक्की नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे भारतीय आज्ज्यांना , तेल-चंपी-मालिश ची अगदी नैसर्गिक दैवी देणगी आहे. पोरांना चांगलं रगडून काढून तेलात एकदम चिंब भिजवून काढण्यात, आपल्या देशी आज्ज्यांचा कोणीच हात धरू शकत नाही ..हे मात्र "सोला आने सच" आहे.
 
तर, ह्या आजी-आजोबांच्या भरवश्यावर आम्ही निर्धास्त पणे आपल्या नोकरी धंद्यात, करियर मध्ये व्यस्त राहू शकलो. आणि कुठल्याही प्रकारची तक्रार, कुरबुर, चिडचिड न करता, आपल्या नातवंडांसाठी आपल्या सगळ्या आजरांवर, दुखण्यांवर मात करून, या लहानग्यांची अगदी डोळ्यात तेल घालून, वर्षानुवर्षे निरपेक्ष बुद्धीने काळजी घेतली. Daycare मध्ये आपल्या नातवंडांची तब्येत खालावू नये, त्यांच्या आयुष्याच्या, महत्वाच्या आरोग्यवाढीच्या काळात, त्यांची कोणत्याही प्रकारची आबाळ होऊ नये, याकडे त्यांनी खूप जातीने लक्ष दिले.
  
आता हेच हात थरथरायला लागलेत, सुरकुतलेत. सांधे आणि गुढगे बोलायला, जोरजोरात अवघड ताना मारायला लागलेत.  वयोमानापरत्वे माझ्या आईला जरा ऐकू कमी येत असे. काही वर्षांपूर्वी मुंबईत, एकदा हॉस्पिटल मध्ये admit  असतानाचा हा प्रसंग. घरी आल्यावर आम्ही सगळे, आई सकट यावर खूप हसलो आणि अजूनही हसतो. सकाळी सिनियर डॉक्टर, त्यांच्या ज्युनिअर स्टाफ - (शिकाऊ) डॉक्टरां बरोबर येत असत. पण त्या दिवशी मोठे डॉ.सर्जरी मध्ये व्यस्त असल्याने थोडेसे उशिरा आले. पण नेहेमीच्या ठरल्या वेळी, त्यांचा इतर स्टाफ राऊंडला आला. व त्यांनी नर्सेस ना विचारून ब्लड, Urine , स्टूल  रिपोर्ट्स बघायला सुरुवात केली.
1)    डॉक्टर:  गुड मॉर्निंग Mrs.Govekar  ... I am Dr.Bhushan
आई : मोशन ..नॉर्मल, नो प्रॉब्लेम
डॉक्टर:  Mrs.Govekar  ... I am Dr.Bhushan
आई : मोशन ..नॉर्मल, नो प्रॉब्लेम एकदम नॉर्मल.  (तिला ऐकू आलं भूषण/मोशनकि ते स्टूल रिपोर्ट - पोटाची चौकशी करत आहेत. त्यामुळे हा गैरसमज.)
2)    आता किचन मध्ये ज्योतीं बरोबरचा हा अलीकडचा संवाद
ज्योती:  मम्मी, भांडी दे ?
आई : अंडी ? घे ना..
ज्योती:  मम्मी, भांडी
आई : अंडी ? घे ना  घे ...हवी तेवढी घे ...
पण, जरी कान कमी सर्विस द्यायला लागले, हाता-पायातली शक्ती कमी व्हायला लागली तरी समरणशक्ती आजही अतिशय तल्लख आहे,  शाळेत वयाच्या पाचव्या वर्षी पाठ केलीली २७ नक्षत्रे अजूनही तिच्या अगदी खणखणीत लक्षात आहेत. त्यामुळे सारखं राहून राहून कुठेतरी जाणवतं, एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं, बडबड मुख असू देत की कमी ऐकू येणारे कान.....घरात कोणीतरी मोठं पाहिजेच....

आमचे पप्पा आजोबा - LIC मध्ये Divisional Manager होते. ऑफिस मधल्या स्त्री वर्गाची नेहमीची तारेवरची कसरत - घर, मुलं-बाळ, नोकरी आपल्या सगळयांना ठाऊकच आहे.  त्यामुळे ऑफिस मधला एकंदरीत सगळाच स्टाफ, फार लांबून प्रवास करणाऱ्या, खूप दूरवर राहणाऱ्या तरुण मुलं-मुलींची ते विशेष काळजी घेत. खूप मोठ्या हुद्द्यावर असून देखील, एक चांगला, शिस्तप्रिय, मनमिळावु फ्रेंडली बॉस म्हणून त्यांची ख्याती होती.  मी दोन वर्षांपूर्वी भारत दौऱ्यात, मुलानां मजा म्हणून जुहूला सहज आजोबांचं ऑफिस दाखवलं.  तर आज सेवानिवृत्त होऊन देखील५/६ लोकं(स्टाफ) स्वतः आपल्या खुर्चीतून उठून येऊन अत्यंत मनापासून त्यांची चौकशी करून गेले. त्यावेळी, मला खरंच खूप अभिमान आणि कौतुक वाटलं ..आमच्या ह्या पप्पा “Popular”आजोबांचं!

गेली १८ वर्षे ,आम्हां चौघांच्या वाढदिवसाला सकाळी सकाळी फोनवर, न विसरता आम्हांला शुभेच्या दिल्या जातात. आणि मेल बॉक्स मध्ये त्यांनी अगदी टायमात पाठवलेलं ग्रीटिंग कार्ड आमची वाट पाहत असतं. आजही वयाच्या ८३ व्या वर्षी नातवंडांसाठी दिवाळीचा फराळ, मुलांच्या आवडीचा खाऊ, कपडे खरेदीचा उत्साह एखाद्या तरुण/तरुणीला लाजवील एवढा आहे ... Simply Hats off to their sincerity!

एकत्रित कुटुंबात वाढलेल्या, माझ्या सासूबाई देखील King George शाळेत Vice Principal होत्या. घरदार, नातेवाईक, आला-गेलं सगळं सांभाळून, त्यांनीही खूप कष्ट करून, शिक्षण क्षेत्रात आपलं स्वतःच असं स्थान स्थापित केलेलं आहे. दुपारी मुलं शाळेतून घरी सुखरूप घरी येई पर्यंत आजी त्यांची एकटक वाट पाहत असायची. मग त्यांना जेवू -खाऊ घातल्यानंतर मग ती दुपारी थोडा आराम करीत असे. मुलं त्यांना नेहेमी विचारत - आजी, तू जेवला कामग आजी म्हणायची ...हो ...मी पण जेवला..ह्या चौघांचं संभाषण कानाला एवढं गोड, वाटायचं की त्यांच्या मराठी व्याकरणाची आम्ही कधी जाणून-बुजून दखल घेतली नाही किंवा घ्यावीशी वाटली नाही.

मिहीरच्या जन्मावेळीस लता आजीला mild Heart Attack आला होता पण तो डायबेटीस मुळे लक्षात आला नाही. ह्या Service Oriented आजी-आजोबांकडे  "Space" नावाची भानगडच कधी न्हवती ....का त्यांना त्याची आवश्यकताच कधी वाटली नाही?  ही आपली भारतीय संस्कृती..आज कित्येक आजी-आजोबा अमेरिकेच्या थंडी, बर्फाला, एकटेपणाला कंटाळून इकडे यायला सरळ नकार देतात. असो. आम्हा चौघांची पुण्याई म्हणा किंवा गेल्या जन्मी आम्ही काहीतरी नक्कीच चांगलं काम केलं असावं, त्यामुळे आम्हाला असे आमचे, हक्काचे "पालक" लाभले. त्यासाठी आम्ही त्यांचे आणि देवाचे सदैव ऋणी आहोत.  खूप मस्ती केल्यावर, वेळ प्रसंगी मुलांना हग्या दम द्यायला आणि दुसऱ्याच क्षणी सगळा राग विसरून त्यांना छातीशी घट्ट धरून, कवटाळायला ........घरात कोणीतरी मोठं पाहिजेच....

आपला Heart Trouble, Diabetes, Frozen Shoulder, Arthritis, Cancer  ह्या सगळ्याशी असलेली जुनी मैत्री निभावत, तोंड देत, वर्षानुवर्षे झुंजत, नातवंडांच्या साध्या एका शिंकेने, मामुली सर्दी-पडशान्ये काळजीने कासावीस होणारे लता-आजी (गोवेकर), स्मिता-आजी आणि पप्पा आजोबा(जावकर) नक्कीकिस मिट्टी के बने है ?.....हे आज तागायत मला, माझ्या वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी देखील न सुटलेलं कोडंच आहे......

सौ. सरोज प्रशांत जावकर (गोवेकर)
December 26, 2016








(भावना आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा माझा मनस्वी प्रयत्न. त्यासाठी शब्द नेहेमीच अपुरे पडतात. पण तरीही हा गहन विषय मला आत्यंतिक जवळचा – "Close to my heart " असल्याने माझा हा मोडका-तोडका प्रयत्न, तुम्ही गोड मानून घ्याल, यात शंकाच नाही!. म्हणून तुमच्या अभिप्राय/प्रतिक्रिया ऐकायला मला नक्कीच आवडेल.  तुमच्या सवडीनुसार Facebook ऐवजी, ह्या माझ्या ब्लॉगवर (https://goolmohar.blogspot.com/) जर तुमच्या comments/thoughts share केल्या तर, त्या माझ्या संग्रही राहतील आणि माझं लेखन सुधारायला  तुमच्या मौलिक विचारांची नक्कीच मदत होईल.. धन्यवाद फिर मिलेंगे!)


1 comment:

  1. Once again Saroj u have written a beautiful blog on parents and your inlaws.Its indeed a rarity these days,to write so much about the elders in your family...and your so emotional blog comes as a whiff of fresh air.
    These days all the elder persons in all the families feel left out, alone and tend to be sufferers of lost identity. I hope the younger generation reads your blog and gives a small bit of their time to elders around.
    One must not forget that becoming old is inevitable whatever antiaging derivatives you use...Haahaaa
    The sooner one understands the better....
    We tend to imbibe what we see in our initial formative years.."SANSKAR"as we call them... from your write ups you are the lucky one to have had good sanskars...
    God bless u...thanks for writing a wonderful blog

    ReplyDelete